‘रेखा’ अर्थात ‘भानुरेखा गणेशन’च्या जीवनाबद्दलचं कुतूहल शमवणारं पुस्तक
‘रेखा’ हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक वादळी व्यक्तिमत्त्व आहे! तिच्यावरच्या सर्व आरोप-प्रत्यारोपांसह आपल्यापुढं सच्चेपणानं उभं राहतं. आयुष्यात घडणाऱ्या प्रतिकूल घटनांना कायमच झुंज देणाऱ्या वास्तवातल्या नायिकेचं हे शब्दबद्ध झालेलं रूपही तितकंच भावतं. रेखाबद्दल मनात आत्मीयता निर्माण करतं. हिंदी चित्रपटसंस्कृतीचा दांभिकतेचा बुरखा फाडण्याचं आणि वास्तवातला चेहरा दाखवण्याचं काम हे पुस्तक अगदी सहजतेनं करतं.......